नाभिक समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा हातकणंगले येथे सत्कार
कुंभोज, प्रतिनिधी( विनोद शिंगे ):-ओबीसी जन यात्रेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश उर्फ बाळासाहेबआंबेडकर,पक्ष प्रवक्ते प्रा.सोमनाथ साळुंखे हे शाहू महाराज समाधी स्थळ या ठिकाणी आले होते.
ओबीसी आरक्षणाच्या संबंधित ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या संबंधित घेतलेल्या निर्णयाचे स्वागत कोल्हापूर मध्ये आल्यानंतर नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी बाळासाहेब साळोखे, विजय मांडरेकर,अनील मांडरेकर , सयाजी झुंजार ,बी एल शिंगे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सत्कार केला.तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील इंगळे आणि हात.तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंगे, विनोद कदम यांच्या सह नाभिक समाज शिष्टमंडळाने हातकणंगले येथे चर्चा करून पुढील दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.