Home कोल्हापूर जिल्हा अंबप येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास प्रांरभ 

अंबप येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास प्रांरभ 

अंबप येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास प्रांरभ

 

 

पेठ वडगाव,(प्रतिनिधी) :- राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु केली आहे. या योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत अंबप ता.हातकणंगले येथील ग्राम पंचायतवतीने आज बुधवारी हातकणंगले तालुका  तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या प्रमुख उपस्थित अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात आला.

राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”अंतर्गत अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै पर्यंत ठेवली होती. परंतु महिलांना कागदपत्राची जुळवणी आणि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी या मर्यादेत सुधारणा केली आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महीलांना एक जुलैपासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

यावेळी लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने,माजी जि.प. सदस्य मनिषा माने , उपसरपंच माणिक दाभाडे, मंडळ अधिकारी, तलाठी, नागरिक तसचे महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.