Home कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर आगारात वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात  

कोल्हापूर आगारात वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात  

कोल्हापूर आगारात वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी) :- पर्यावरणाचा जागर व वृक्षसंर्धन या उद्देशाने एसटी महामंडळ कोल्हापूर आगारात वतीने पर्यावरण दिनाच्या औचित साधून वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले. विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते पालखीचे पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण उपविभागी अधिकारी प्रियंका दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर आगार परिसरात जांभूळ लिंब ,पिंपळ, उंबर , फणस ,करंजी इत्यादी प्रकारचे पन्नासहुन अधिक रोपटी लावण्यात आली.                                        दरम्यान फुलांनी सजवलेल्या पालखीचे बसस्थानक परिसरात अधिकारी , कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वनसंवर्धन विषयक बॅनर घेऊन जनजागृतीचा संदेश देत वृक्षदिंडी काढण्यात आली.

यावेळी युथ फाऊंडेशनचे चंद्रकांत कांडेकरी, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, अतुल मोरे, आगारप्रमुख अनिल म्हेत्तर, बसस्थानक प्रमुख मल्लेश विभुते, सहा.कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी, विजय निगडे ,लेखाकार राम पोळ,राम येडगे, संजय घाटगे, उत्तम पाटील, नामदेव रोडे, संजीव चिकुर्डेकर, अनिता पाटील,अंकिता राऊत, सोनाली कोळी, वैशाली पाटील, माधुरी केसरकर, संजीवनी ढोणे, रुपाली नेहतराव, किरण कुरणे, निलम कांबळे आदी उपस्थित होते.