बेळगावातील लाल-पिवळा ध्वज हटवण्याची सेनेची मागणी,

    कोल्हापूर – बेळगाव महानगरपालिकेसमोर उभारलेला कर्नाटक रक्षण वेदिका संघटनेचा लाल- पिवळा ध्वज हटवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरसह सांगली सातारा या जिल्ह्यातील कन्नड व्यवसायिक यांचे व्यवहार २० मार्च रोजी बंद ठेवण्याचा आवाहन केलेल आहे.
    या दिवशी या तीन जिल्ह्यातील एकाही कन्नड व्यवसायिक दुकान चालू दिला जाणार नाही, अशा पद्धतीचा इशारा शिवसेनेनं दिलाय. त्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारला जाग नाही आली तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी दिला आहे.
    गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुखावर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड व्यवसायिकांना आता शिवसेनेने इशारा दिला आहे. बेळगाव महापालिकेसमोर गेल्या कित्येक दिवसांपासून बेकायदेशीररित्या लाल-पिवळा ध्वज कन्नड संघटनांनी लावला आहे.
    त्याला अनेक वेळा विरोध करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर ती उतरली होती मात्र तो ध्वज अद्यापही हटवला गेला नसल्याने येत्या २० मार्चला कोल्हापूर सह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने केला आहे जर एखादा व्यवसाय सुरू राहिला तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.