पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी संपन्न
कोल्हापूर /(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) शाळा शिष्यवृत्ती परिक्षा आयोजित करणेत आली होती. सदरची परीक्षा कोल्हापूर जिल्हयातील इ ५ वी १५५ परीक्षा केंद्रांवर व इ.८ वी साठी ९९ अशा एकूण २५४ केंद्रावर घेणेत आली. सदर परीक्षेला इ. ५ वी चे ९९.१८ टक्के व इ. ८ वीचे ९७.८०टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता पचवी केंद्र संख्या १५५ एकूण परिक्षार्थी संख्या २६५६४,उपस्थित विद्यार्थी संख्या २६३४७,एकूण टक्केवारी ९९.१८ इतकी आहे.इयत्ता ८वी केंद्र संख्या ९९,एकूण परिक्षार्थी संख्या – १४९३५, उपस्थित विद्यार्थी संख्या – १४६०७ एकूण टक्केवारी ९७.८० इतकी आहे.
पाचवी व आठवीचे एकूण केंद्र संख्या -२५४ होती. एकूण परिक्षार्थी संख्या – ४१४९९, एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या – ४०९५४ इतकी होती.
उपरोक्त परीक्षा सुरळीत पार पडणेकरीता 254 केंद्र संचालकांची जिल्हा स्तरावरून नियुक्ती करणेत आली होती. सदरची परीक्षा कोल्हापूर जिल्हयातील मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमातून A,B,C,D, या संच कोड प्रश्नपत्रिकेमध्ये घेणेत आली. तसेच सदर परीक्षेत प्रत्येक विदयार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देणेत आली. परीक्षा कामकाज जिल्हयात सर्वत्र सुरळीत पार पाडणेसाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची भरारी पथके नियुक्त करणेत आली होती. तसेच जिल्हा स्तरावरून संपर्क तालुक्यातील केंद्र भेटीचे नियोजन करणेत आले होती.
सदर परिक्षेकरीता कोल्हापूर जिल्हा परिषदकडील परीक्षा विभाग प्रमुख विस्तार अधिकारी आर. वाय. ठोकळ, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, आर. व्ही. कांबळे विस्तार अधिकारी, एम. आय. सुतार, विस्तार अधिकारी व कनिष्ठ सहाय्यक, एस. एस. वाठारकर, दत्तात्रय पाटील, कनिष्ठ सहाय्यक यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर यांचे मार्गदर्शन खाली कामकाज पूर्ण केले.अशी माहीती प्रसिध्दीस आर. व्ही. कांबळे विस्तार अधिकारी यांनी दिली.