अंबपमध्ये सोमवारपासून ज्ञानेश्वरी पारायण   

    अंबपमध्ये सोमवारपासून ज्ञानेश्वरी पारायण

     

    नवे पारगाव, ता.30: अंबप (ता.हातकणंगले) येथील माऊली भजनी मंडळाच्यावतीने बिरदेव मंदिरात सोमवार (ता.२) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिनाम सप्ताह सोहळा सुरु होणार आहे.

    व्यासपीठचालक सुभाष शिंगे (नागांव) यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण होणार असून पहाटे 4 वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी 12 वाजता भोजन, सायंकाळी 6 वजता प्रवचन, रात्री 9 वाजता किर्तन, रात्री 11 वाजता हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होतील.

    प्रवचन व किर्तन पुढीलप्रमाणे होतील– सोमवारी (ता.2) राहूल कदम ( आकीवाट), मंगळवारी (ता.3) शिवानंद पाटील (आनाजे), बुधवारी (ता.4) संभाजी दुर्गुळे (दुर्गुळवाडी), गुरुवारी (ता.5) प्रदिप भट्ट (कोल्हापूर).

    शुक्रवारी (ता.6) सकाळी 9 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता व्यासपीठचालक सुभाष शिंगे व लाला महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल.