खोची परिसरात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला सुरुवात
खोची,(भक्ती गायकवाड):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोची परिसरात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विद्यमान आमदार राजूबाबा आवळे,माजी मंत्री जयवंतराव आवळे हे त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.तसेच कार्यकर्त्यांच्या मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मान्यवरांच्या घरी ही भेटी देत आहेत.
कार्यकर्ते आमदार राजूबाबा आवळे यांनी गावात व परिसरात केलेली विकास कामे यांची माहिती मतदारासह ग्रामस्थांना देत आहेत. आतापर्यंत न झालेली कामे तसेच रखडलेली कामे आ.राजूबाबा आवळे यांनी पूर्ण केली आहेत.तसेच गावासह परिसरात आणखीन विकास कामे करणे गरजेचे आहे.यासाठी त्यांना पुन्हा निवडून देणे हे महत्त्वाचे आहे,हे सांगत आहेत.
यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते,हातकणंगले तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुशेनराव शिंदे- सरकार,वडगाव बाजार समितीचे माजी संचालक राष्ट्रवादीचे एम.के चव्हाण,सरपंच स्नेहा पाटील,माजी सरपंच अभिजीत चव्हाण,हणमंत पाटील,शंकर जांभळे,धनाजी पोवार,कृष्णात यशवंत, सचिन जाधव,तानाजी बाबर,संजय मगदूम,अनिल वाघ,सागर गायकवाड, संताजी वाघ,रणजित कुरणे,बिभिषण जगदाळे,शिवसेनेचे राजेंद्र जाधव, आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या समवेत जनसंपर्क अधिकारी रमेश पाटोळे उपस्थित होते.आगामी विधानसभा निवडणुकीत खोचीसह परिसरातून आमदार राजूबाबा आवळे यांना मताधिक्य देऊन कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजूबाबा आवळे यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा आमदार करायचे हे मनावर घेतल्याचे या भागात दिसत आहे.