कुंभोज मध्ये चोरी करताना महिलांना दिला नागरिकांनी  चोप, ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा

    कुंभोज मध्ये चोरी करताना महिलांना दिला नागरिकांनी  चोप, ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-भंगार गोळा करणारी टोळी म्हणून फिरणाऱ्या बायका मोठ्या डल्ल्याच्या नादात असताना रंगेहाथ पकडल्याने महिलांनीच चोप देऊन पुन्हा गावात न दिसण्याचा यलगार दिल्याची घटना आत्ताच धनगरवाडा नजिक मगदूम आईसक्रीम फॅक्टरीतील कॉम्प्रेसर वरच डल्ला मारत असताना घडली.

     

    सुदैवाने जागृत महिलांनी घटना पाहून जागेवरच चोप दिल्याने कुंभोज गावातील आपल्या घराच्या दारातील मोकळ्या जागेतील भंगार/प्लॅस्टिक गोळा करण्याच्या नावाखाली दुपारच्या वेळेत होणाऱ्या लुटीला आज मनसोक्त हात धुवून चोप दिल्याने सदर महिलांनी पुन्हा गावात न येण्याची गयावया केल्याने त्यांची सुटका करण्यात आली. कुंभोज गावामध्ये काही इतर जमातीच्या महिलांच्या चार चाकी गाड्या मोठ्या प्रमाणात आज सकाळी एसटी स्टँड, एम एस ई बी परिसरात दाखल झाले असून कुंभोज ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा देण्यात येत आहे.