स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे):-हातकणंगले तहसीलदार कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या विविध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणाबाजीने परिसरांना निघाला होता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्याचा आला… यावेळी खालील मागणी करण्यात आल्या
१) पूरग्रस्थांचे पुनर्वसन करावे
२) पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीला सन २०१९ प्रमाणे हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी
३) शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा
४) अंकली ते चौकात भूसंपादन जमिनीला चौपट मोबदला मिळावा
५) शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे
६) साठ वर्षावरील शेतमजूर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५०००/- पेन्शन मिळावी
यांसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले..