रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे संचालक सतीशजी मराठे आणि यांचा सत्कार
हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे संचालक सतीशजी मराठे व सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेकजी जुगादे यांनी जयसिंगपुर येथील प्रसिद्ध उद्योजक आण्णासाहेब मोटके पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, आण्णासाहेब मोटके पाटील, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन उपाध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे* यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी सौ कुसुम मोटके पाटील, अभय मोटके पाटील, प्राची मोटके पाटील, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश संघटक संजयजी परमने, सहकार भारती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जवाहरजी छाबडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.