संजीव चिकुर्डेकर यांना यावर्षीचा छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार जाहीर

    संजीव चिकुर्डेकर यांना यावर्षीचा छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार जाहीर

     

     

     

    कोल्हापूर,(प्रतिनिधी):- कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल घेत कालकथित माजी खासदार एस के डीगे मेमोरियल फाउंडेशन कोल्हापूर यांचे मार्फत दिला जाणारा यावर्षीच्या छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार संजीव चिकुर्डेकर यांना नुकताच जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा दि.23 जून रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

    संजीव चिकुर्डेकर हे रा.प.महामंडळामध्ये गेली 36 वर्षापासून कार्यरत असून ते कामगार क्षेत्रात 28 वर्षापासून काम करीत आहेत. कामगार क्षेत्रात कर्मचारी वर्गावर अन्याय होत होत असलेने त्यांना हक्काचा न्याय मिळाला पाहिजे या विचाराने प्रेरीत होऊन त्यांचे स्व. गोविंदराव आदिक ते कामगार नेते आमदार भाई जगताप तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून काम सुरू आहे.

    चिकुर्डेकर यानी रा.प.महामंडळातील महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या राज्यस्तरीय संघटनेचे युनिट सेक्रेटरी, विभागीय कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. ते गेली 16 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे विभागीय सचिव या पदावर कार्यरत आहेत. कामगार वर्गावर अन्याय झालेने त्यानी न्यायासाठी प्रशासनाविरोधात अनेकदा निदर्शने, मोर्चे तसेच 3-3 दिवसाची दोनवेळा आमरण उपोषण अशी आंदोलने यशस्वी करून कामगारांना न्याय मिळउन दिला.त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आमदार भाई जगताप यानी संजीव चिकुर्डेकर यांची केंद्रीय राज्यउपाध्यक्ष पदी निवड केली. त्यानंतर त्यानी आपल्या कार्याचा ठसा राज्यस्तरावर देखील उमटविला. याकामी त्यांना संघटनेचे सरचिटनीस श्रीरंग बरगे यांचेही सहकार्य, मार्गदर्शन लाभले.

    चिकुर्डेकर यानी याप्रकारे कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कालकथित माजी खासदार एस.के. डिगे मेमोरियल फाउंडेशन कोल्हापूर (रजि.) यांचे मार्फत संजीव चिकुर्डेकर यांना यावर्षीचा ‘ छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात येत आहे.