आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा मानस- डॉ.ओमप्रकाश शेटे
इचलकरंजी : आयुष्यमान भारत कार्ड जास्तीत जास्त नागरिकांनी काढून घ्यावे त्यामध्ये जास्तीत जास्त आजारावर उपचार समाविष्ट करण्यात येत आहेत त्यातून लवकरच नागरिकांना सर्वोत्तम उपचार मिळणार असून नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावेत असे आवाहन आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी केले.
इचलकरंजी येथील दौऱ्यात त्यांनी सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी नागरिक मंचचे प्रमुख अभिजित पटवा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असुन कोणताही नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
स्वागत अभिजित पटवा यांनी केले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करावेत त्यांना सर्वोतपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन ही डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
यावेळी इनामचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.यावेळी आनंदसागर पुजारी,कपिल पाटील,मदन गोरे,योगेश भळगट,बाळु भंडारी,संजय गुगळे,अमित पटवा,विद्यासागर चराटे,राजु कोन्नुर,उदयसिंह निंबाळकर, दीपक लाटणे,अभिषेक केरले उपस्थित होते.