खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात आमदार विनय कोरे ठरले किंगमेकर , वारणा व महाडिक पॅटर्न यशस्वी
कुंभोज,प्रतिनिधी(विनोद शिंगे):- हातकणंगले लोकसभेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये खासदार धैरशील माने यांनी विजय प्राप्त करुन दुसऱ्यांदा ते हातकणंगले मतदारसंघाच्या खासदार पदी विराजमान झाले.परिणामी कुंभोज परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच कोरे आवाडे, महाडिक, सदाभाऊ खोत गटातील कार्यकर्त्यांनी एसटी स्टँड परिसरात फटाक्याची आताषबाजी व गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष साजरा केला. खासदार धैयशील माने यांना निवडून आणण्यात कुंभोज गावचे सुपुत्र वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील हे किंगमेकर ठरले.
हातकलंगले लोकसभेच्या निकालाची उत्कठा सगळ्यांनाच लागली होती. दिवसभराच्या रणधुमाळी मध्ये बऱ्याच वेळा ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा सुरडकर व शिंदे गटाचे उमेदवार धैरशील माने यांच्यात सतत मतात चढावर होत होते. त्यामुळे निवडणुकीचा कौल नेमका कोणाच्या बाजूने कळणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधले असतानाच शेवटच्या चार फेरीमध्ये धैार्यशील माने यांच्या मताचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला व धैर्यशील माने यांनी 15 हजाराची आघाडी घेतली. ही आघाडी घेण्यासाठी वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांचे मोलाचे योगदान लाभले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना महाडिक कोरे आवाडे गटाचे मोठे सहकार्य लाभले, शेवटच्या चार दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेने मतदार संघातील चित्रच पालटले, परिणामी धैर्यशील माने यांनी त्यांचे आजोबा माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या जुन्या कार्यकर्त्यांची संपर्क साधून पुन्हा एकदा माने गट अस्तित्वात आणण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या फायद्याचे ठरले, परिणामी कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात धैयशील माने यांचा गड अबाधित राखण्यासाठी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील कुंभोज यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्यांच्या योग्य नियोजनामुळेच कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात धैर्यशील माने यांना चांगले मताधिक्य मिळवून देण्यास सहकार्य मिळाले. कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी विरोधात खासदार धैर्यशील माने अशीच लढत झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा सुरूडकर यांनीही चांगलीच फाईट दिली आहे.
कुंभोज येथे माजी खासदार राजू शेट्टी, विद्यमान खासदार धैर्यशील माने, सत्यजित आबा सुरुडकर यांना चांगल्या पद्धतीची मताधिक्य मिळाले, परिणामी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे कुंभोज गावचे सुपुत्र असूनही कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांना म्हणावे तितक्या प्रमाणात सहकार्य लाभले नाही .मागील निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीने मताची आकडेवारी लाखाच्या पुढे होती परंतु यावेळी ती मात्र काही हजारात आली असल्याचे चित्र दिसत आहे.
खासदार धैयशील माने यांच्या विजयासाठी वारणा कॉम्प्लेक्स महाडिक पॅटर्न, याचा चांगलाच वापर केला गेला असल्याचे चित्र मतदार संघात दिसत होते, परिणामी धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की नाही यामध्ये आठ दिवस गेले, उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराची यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने राबविण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सहभाग घेऊन धैर्यशील माने यांच्या विजयासाठी कंबर कसली, शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनस्वुराज पक्षाचे नेते आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक ,माजी मंत्री सदाभाऊ खोत,आ.राजेद्र पाटील एडावकर यांच्या खांद्यावर धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा देऊन, धैर्यशील माने यांचा विजय झाल्यास कोरे ,आवाडे ,महाडिक हे किंग मेकर ठरतील असे वक्तव्य केले होते. परिणामी खऱ्या अर्थाने जनुसराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपल्या नेत्याला किंगमेकर करण्यासाठी केलेले प्रयत्न सत्कारणी लागले व धैर्यशील माने यांच्या विजयात आ विनय कोरे हे किंग मेकर ठरले यांचा मोलाचा वाटा ठरला. धैर्यशील माने यांच्या विजयात माजी आमदार महादेव रावजी महाडिक व आमदार प्रकाश आवडे यांच्या गटाचेही मोलाचे योगदान लाभले. खासदार धैरशील माने यांच्या दुसऱ्यांदा विजयाने पुन्हा एकदा माझी खासदार बाळासाहेब माने यांचा जुना गट राजकारणात सक्रिय झाला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून, खासदार धैयशील माने यांच्या विजयामुळे कुंभोज सह परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्याची आकाशबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी वारणा दूध संघाची संचालक अरुणरावजी पाटील, कुंभोज शिवसेना शहराध्यक्ष निवास माने, तेजस कोळी, अनिल माने ,मधुकर घोदे, प्रकाश हाराळे,पवन तानगे,भरत भगत ,जयराम मिसाळ ,अमोल गावडे ,विनायक पोद्दार ,राहुल कते,संभाजी मिसाळ, संदेश भोसले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश तानगे,संभाजी चव्हाण ,अमित साजनकर ,राणी पाचोरे,गुणधर पाचोरे,बापुसो पाटिल आदींनी एसटी स्टँड परिसरात आपला आनंद साजरा केला.