कोल्हापूरात भीषण अपघात ; भरधाव कारने चार दुचाकीना उडवले 3 ठार तर 6 गंभीर

    कोल्हापूरात भीषण अपघात ; भरधाव कारने चार दुचाकीना उडवले 3 ठार तर 6 गंभीर

     

     

     

     

     

     

     

     

     

     

    कोल्हापूर,(प्रकाश कांबळे) : येथील सायबर चौक येथे चौकातून जाणाऱ्या भरधाव चारचाकी (सेंट्रो) गाडी क्र. MH 09 BM 2892 या गाडीने चार मोटर सायकल गाड्याना पाठीमागून उडवले यामध्ये 3 ठार तर 6 गंभीर जखमी झाले आहेत.

     

    याबाबत मिळालेली माहिती अशी की सायबर चौक येथून जाणाऱ्या चार मोटरसायकल गाड्याना आपल्या गाडीवर ताबा सुटल्याने चारचाकी स्वाराने उडवले यामध्ये 3 ठार तर 6 गंभीर जखमी झाले आहेत.

     

    यामध्ये चारचाकीतील चालक ही मयत झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस व शहर वाहतूक पोलीस यांनी घटना स्थळी धाव घेतली.

     

    गंभीर जखमीना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व जखमीची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

     

     

     

     

     

    अपघातामधील त्या बाईकवरील लाल टी शर्ट आहे तो आणि इतर दोन मुले राजाराम तलावात अंघोळ करून परत जात होती. त्यामध्ये दोन सख्खे भाऊ होते. त्यापैकी नुकताच दहावी पास झालेला प्रथमेश पाटील हा मुलगा जागीच ठार झाला तर त्याचा मोठा भाऊ सिटी हॉस्पिटलमध्ये सिरीयस आहे.

     

    सँट्रो कार चालवणाऱ्या वृद्धाला हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा पाय ब्रेक ऐवजी एक्सीलेटर वर पडल्यामुळे स्पीड वाढले आणि त्यांचा ताबा सुटून अपघात झाल्याचे सांगण्यात येते. कारचालक ही अटॅकने मृत पावले आहेत.या अपघातात आणखी काही जण जखमी झाले आहेत असे समजते.