कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात व खासगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती तात्काळ गठीत करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कोल्हापूर या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिग छळाची तक्रार होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात व खासगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या कार्यालयाचे / आस्थापनांचे प्रमुख /मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही. (ब) अधिनियमातील कलम 13,14,22 नुसार कारवाई केली नाही (क) या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदारीचे पालन न केल्यास कार्यालयाचे/ आस्थापनांचे प्रमुख /मालकाला 50 हजार रू. पर्यंत दंडाची तरतुद आहे. तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द करणे, दुप्पट दंडाची तरतुद आहे, असेही त्यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.