वडिलांच्या श्राध्दाचा खर्च केला कोरोना योद्ध्यांना साहित्य देऊन

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    नवे पारगाव (प्रतिनिधी संतोष जाधव ) : वडिलांच्या दुसऱ्या श्राद्धाचा खर्च टाळून किणी (ता. हातकणंगले) येथील विशाल लोकरे यांने कोरोना योद्ध्यां आरोग्य सेविका, आशा वर्कर,अंगणवाडी सेविकांना साहित्य दिले. लोकरेस मित्र धिरज चव्हाणनेही आर्थिक सहकार्य केले.
    किणी येथील कै.अशोक लक्ष्मण लोकरे यांचे दुसरे पुण्यस्मरण होते. पुण्यस्मरणचा खर्च टाळून मुलगा विशाल लोकरे व मित्र धिरज दौलतराव चव्हाण यांनी आरोग्य सेविका, आशा वर्कर,अंगणवाडी सेविकांना मास्क सॅनिटीझर व इतर साहित्य वाटप केले . या उपक्रमाचे किणी परिसरात कौतुक होत आहे. हे साहित्य वाठारच्या मंडळ अधिकारी अनिता खाडे, पेठ वडगांव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सुर्यवंशी यांच्या हस्ते,ग्रामसेवक व्ही.टी.पंडित, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजित पाटील, पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाटप केले. स.पो.नि.सुर्यवंशी व मंडळ अधिकारी सौ.खाडे यांनी विशाल लोकरे व धिरज चव्हाण यांचे कौतुक केले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements