संभाजी भिडे गुरुजी यांची शिरोली येथे भेट
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांची शिरोलीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे यांच्या घरी सदिच्छा भेट.याप्रसंगी आमदार अशोकराव माने (बापु )व. संताजी घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच करपे यांनी गुरुजींचे औक्षण करून आशीर्वाद घेतले. तर माजी उपसरपंच कृष्णात करपे यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा करपे, माजी उपसरपंच श्री कृष्णात करपे यांच्या शुभहस्ते हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अशोकराव माने बापू व श्री संताजी घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विठ्ठल पाटील ग्रामपंचायत सदस्या अनिता शिंदे, मनीषा संकपाळ, दीपक यादव, हर्षदा यादव, शितल करपे , अर्जुन चौगुले नितीन चव्हाण धारकरी तसेच जय भवानी तालमीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज