माझ्या विजयात माजी.आम.महादेवराव महाडिक यांचा मोलाचा वाटा-आमदार अशोकराव माने
कुंभोज,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):- हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून महाविजय मिळाल्यानंतर जिल्ह्याचे लोकनेते मा.आमदार श्री.महादेवरावजी महाडिक (आप्पा) यांची छ.राजाराम कारखाना कार्यस्थळावर भेट घेतली. यावेळी माझ्या या महाविजयामध्ये आदरणीय आप्पांचा सिंहाचा वाटा आहे आदरणीय आप्पांनी लावलेल्या जोडण्यांमुळे माझ्या विजय सोपा झाला त्याबद्दल आदरणीय आप्पांचा पुष्पहार घालून सत्कार केला व केलेल्या सहकार्याबद्दल मनःपुर्वक आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आमदार अमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्याने समाजहित डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक काम करण्याची ग्वाही दिली.
यावेळी माझ्यासोबत छ.राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील,वडगांव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, मा. जि.प.सदस्य अरुण पाटील, उद्योगपती आदित्य सुर्यवंशी,मा.नगराध्यक्षा डॉ. नीता माने,सुहास राजमाने,उद्योगपती धनंजय टारे,रविकिरण गवळी यांसह कारखान्याचे संचालक,कर्मचारी उपस्थित होते.