हातकणंगले विधानसभा निवडणुकीत दलितमित्र अशोक माने यांना प्रचंड मताने विजयी करा- आमदार विनय कोरे

    हातकणंगले विधानसभा निवडणुकीत दलितमित्र अशोक माने यांना प्रचंड मताने विजयी करा- आमदार विनय कोरे

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी( विनोद शिंगे):-वारणानगर (ता.पन्हाळा) येथे आगामी हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

     

    गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेला निसटता पराभव उद्याच्या निवडणुकीत आत्मविश्वासाने सामोरे जाऊन हातकणंगले विधानसभेतून दलितमित्र डॉ.अशोकराव माने बापूंना ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यानी केले..

    तसेच २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांना उमेदवारी दिली. अचानक दिलेल्या उमेदवारीमुळे त्यावेळी काही अडचणी निर्माण झाल्या.त्यामुळे निसटता पराभव स्वीकारावा लागला मात्र गेल्या पाच वर्षात दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू ) यांनी मतदारसंघात ठेवलेला संपर्क आणि वारणा समुहातील पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू ) हे नक्कीच मात्र मोठ्या आत्मविश्वासाने ४० हजारांच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केला…

    गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून पाच वर्षात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या नेतृत्वाखाली गावा – गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आहे अनेकांच्या सुख दुःखात सहभागी झालो आहे.आमदार नसतानाही विकास कामे खेचून आणली पण विद्यमान आमदारांनी मात्र अन्य आमदारांच्या तुलनेत या मतदारसंघाचा विकास केला नाही त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अद्यापही मागासलेलाच आहे त्यामुळे या मतदारसंघांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला विजय करण्याचे आवाहन दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू ) यांनी केले.

    यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या),वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील,सुभाष पाटील,उदयसिंह पाटील,किशोर पाटील,विजय पाटील,वारणा बॅंकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील,वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी,वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.