सिप्लाच्या उपाध्यक्षांची घोडावत विद्यापीठास भेट, सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    सिप्लाच्या उपाध्यक्षांची घोडावत विद्यापीठास भेट

    सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव

    Advertisements

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कंपनी क्वालिटी अफेयर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव आसगेकर यांनी नुकतीच घोडावत विद्यापीठास भेट दिली.यावेळी विद्यापीठाकडून सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव ठेवण्यात आला. यासाठी सिप्ला कंपनीच्या प्रमुखांबरोबर सकारात्मक चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

    यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे ,विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे डीन डॉ. विवेक कुलकर्णी, औषध निर्माण शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुभाष कुंभार, विज्ञान व अलाइड हेल्थ सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. आनंद सावंत, प्रशिक्षण व प्लेसमेंटचे संचालक डॉ. नितिन पुजारी, विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्निल हिरीकुडे,बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. जीवन लव्हांडे, डी. फार्म विभागप्रमुख,डॉ. विद्याराणी खोत, टीपीओ समन्वयक प्रा. सुरज पाटील उपस्थीत होते. शैक्षणिक समन्वयक अश्विनी चकोते यांनी आसगेकर यांचे स्वागत केले.

    यावेळी फार्मसी इमारतीतील अत्याधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, आणि शैक्षणिक डिजिटल साधने पाहिली. त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून सिप्ला आणि विद्यापीठ यांच्यातील सहयोगाबद्दल विचारविनिमय केला. विद्यार्थ्यांसोबत सिप्ला कंपनीमधील संधींबद्दल चर्चा केली. तसेच इंटर्नशिप प्रोग्राम्स, आणि उद्योगविशिष्ट प्रमाणपत्र अभ्यासक्रम विषयक चर्चा केली. सिप्ला प्रायोजित प्लेसमेंट ड्राइव, अलुमनी मेंटॉरशिप प्रोग्राम्स आणि कौशल्य विकास कार्यशाळेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. सेंटर फॉर एक्सलन्स साठी विश्वस्त विनायकजी भोसले यांच्याशी चर्चा करताना आसगेकर यांनी सिप्ला आणि घोडावत विद्यापीठ यांच्यामध्ये भविष्यात सहकार्य वाढत राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements