कोल्हापूर विभागास 2.16 कोटी नफा ; एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेकडून विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांचा सत्कार

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कोल्हापूर विभागास 2.16 कोटी नफा ; एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेकडून विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांचा सत्कार

     

     

    कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्य.परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागास सर्व अधिकारी,पर्यवेक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याने ऑगस्ट 2024 मध्ये 2 कोटी 16 लाख रुपये इतका नफा झाल्याबद्दल महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या वतीने नुकताच विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांचा संघटनेचे उपाध्यक्ष संजीव चिकुर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    Advertisements

    यावेळी संजीव चिकुर्डेकर म्हणाले की विभागातील सर्व अधिकारी,पर्यवेक्षक, चालक,वाहक,यांत्रिक कर्मचारी तसेच प्रत्येक घटक यांनी गाड्यांची अपुरी संख्या, अपुरा कर्मचारी वर्ग असताना सामूहिक कामगीरी करीत जवळपास 70 लाख किलोमीटर पूर्ण करुन 82 लाख प्रवाशांची वाहतूक करीत हे यश मिळविले असून सर्वांच्या कामगिरीचे कौतुक असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यानी तत्कालीन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के मॅडम यांचेही कौतुक करीत अभिनंदन केले. सत्कार सोहळ्या प्रसंगी विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी हा सत्कार माझा एकट्याचा नसून विभागांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा असल्याचे विदित केले.

    या सत्कार सोहळ्या प्रसंगी यंत्र अभियंता यशवंत कानतोंडे, वाहतूक अधिकारी संतोष बोगारे, कामगार अधिकारी संदीप भोसले, लेखाधिकारी मानिनी तेलवेकर तसेच संघटनेचे पदाधिकारी सुनिल घोरपडे, श्रीधर मांगलेकरसंदीप पाटील, अय्याज चौगुले, दीपाली येलबेली, अंकिता राऊत, उत्तम पाटील, परवेझ मोमीन हे उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements