मातंग विकास महासंघ प्रबोधिनीचे सामाजिक कार्य उल्लेखनीय- आम.राजुबाबा आवळे
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा सकल मातंग समाज व मातंग विकास महासंघ प्रबोधिनी यांनी गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला आमदार राजु बाबा आवळे यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थांचा तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांसह, सामाजिक कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी आमदार राजीव किसन आवळे, संयोजक प्रा. अशोक आळतेकर, बाबासो यशवंत यांच्यासह मातंग समाजातील कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.