शिवशक्ती दूध संस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
वाठार,प्रतिनिधी( किशोर जासूद):-श्री शिवशक्ती सहकारी दूध संस्थेची (वठार) 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहवर्धक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी वाठार गावचे नूतन सरपंच, उपसरपंच तसेच विविध शासकीय पदावरती नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. वार्षिक सभेमध्ये बोलताना संस्थेचे मार्गदर्शक युवा उद्योजक मा श्री शरद बेनाडे साहेब यांनी “डेरी व दूध उत्पादक यांच्या समोरील भविष्यातील अडचणी तसेच संधी यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या उत्पादकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी पतसंस्था तसेच दूध व्यवसायासाठी पूरक व्यवसाय डेरीमार्फत सुरू करण्याचा मानस व्यक्त केला “. या प्रसंगी उत्पादकांनी जोरदार प्रतिसाद दिला.यावेळी संस्थेस सर्वात जास्त गाय व म्हैस दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांची नावे जाहीर करण्यात आली तसेच शासनाकडून गाईच्या दुधासाठी आलेले वाढीव अनुदानाचे चेक उत्पादकांना देण्यात आले.
स्वागत संस्थेचे सेक्रेटरी अमोल शिंदे यांनी केले, प्रस्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन सयाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता व आभार संस्थेचे संचालक अमोल क्षीरसागर यांनी मांडले.यावेळी संस्थेचे चेअरमन रघुनाथ शिंदे, व्हाईस चेअरमन सयाजी पाटील, संचालक आर के पाटील, अमोल चौगुले, किरण माळी, विकास कांबळे, गजानन पाटील महिला संचालिका सौ मेघा माळी, सौ सुधा कुंभार , सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच गजेंद्र माळी, सुरज चौगुले, गजानन खबाले संस्थेचे दूध उत्पादक सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.