५० हजारांवर महिला कार्यक्रमासाठी वारणेवर उपस्थित राहणार – शुभलक्ष्मी विनय कोरे

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    ५० हजारांवर महिला कार्यक्रमासाठी वारणेवर उपस्थित राहणार – शुभलक्ष्मी विनय कोरे

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-वारणानगर (ता.पन्हाळा) येथे सोमवार दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.त्यानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व सौ.शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.

    Advertisements

     

    ५० हजारांवर महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार – आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांसाठी शिवनेरी क्रिडांगणावर भव्य चार मंडप उभारण्यात आले आहेत.यामध्ये महिलांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० हजार महिला शिवनेरी क्रिडांगणावर उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी दिली.

    वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी कोल्हापूर जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच येणार असल्याचेही आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.

    तसेच सर्व एस.टी.पार्किंग व्यवस्था कारखाना मुख्य वाहनतळ गाडी अड्डा व साखर कारखाना गोडाऊन शेजारील गाडी अड्डा येथे सोय करण्यात आली आहे. इतर सर्व वाहने पेपरमिल कारखाना जवळील गाडी अड्डा येथे पार्कींग करावीत.

    तसेच सर्व महिलांनी दुपारी १.३० च्या आत शिवनेरी क्रिडांगणावरील उभारण्यात आलेल्या भव्य मंडपातील बैठक व्यवस्थेचा लाभ घ्यावा.सुरक्षेच्या कारणांमुळे दुपारी १.३० नंतर येणाऱ्यास कार्यक्रम स्थळी सोडले जाणार नसल्याची सर्वांनी नोंद घ्यावी..

    तसेच महिलांनी कोणतेही काळे वस्त्र परिधान करू नये किंवा काळ्या रंगाची वस्तू सोबत ठेवू नये. तसेच कोणतीही पिशवी,पर्स,पाण्याची बोटल,छत्री अशा कोणत्याही वस्तू सोबत आणू नयेत. विशेष सुरक्षा पथकाच्या मार्फत प्रवेश द्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले.

    तसेच महिलांच्यासाठी जेवण विभाग पुढीलप्रमाणे १) आर्किटेक्चर कॉलेज जवळील मोकळी जागा – महादुर्गा मंडपम – पन्हाळा तालुक्यातील महिला,२)राधा कृष्ण बिल्डिंग समोर – तुळजाभवानी मंडपम – पन्हाळा तालुक्यातील महिला,३)सिव्हील व केमीकल विभाग – महालक्ष्मी मंडपम – हातकणंगले तालुक्यातील महिला,४) मेकॅनिकल इंजि. विभाग – अन्नपुर्णा मंडपम – शाहूवाडी तालुक्यातील महिला,५) पॉलीटेक्निक विभाग लॉन – महासरस्वती मंडपम – सांगली जिल्ह्यातील महिला…*

    तसेच पुरुषांच्यासाठी जेवण विभाग पुढीलप्रमाणे १) य.च. वारणा महाविद्यालय पूर्व बाजू व ओपन थियेटर – अंबामाता मंडपम – पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पुरुष,२) य.च.वारणा महाविद्यालय पश्चिम बाजू व सायन्स पार्क – नारायणी मंडपम – हातकणंगले व सांगली जिल्ह्यातील पुरुष अशी पुरुषांच्यासाठी २ तर महिलांच्यासाठी ५ अशी एकूण ७ ठिकाणी सायंकाळी ५.१५ नंतर जेवण व्यवस्था करण्यात आली असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले..

    यावेळी सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था,शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्था,श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ सर्व विद्याशाखा,वारणा भगिनी मंडळ,लिज्जत पापड केंद्र,वारणा बझार,निर्मिती सखी मंच – ऐतवडे,ए.बी.पी.शिक्षण संकुल – पारगाव या संस्थेतील सर्व महिला पदाधिकारी व कर्मचारी बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements