कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांची तळसंदे कृषि विज्ञान केंद्रास भेट

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांची

    तळसंदे कृषि विज्ञान केंद्रास भेट

    Advertisements

     

    पेठ वडगाव : भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या पुणे येथील पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालयाचे शास्त्रज्ञ डॉ. संजय वसंत कड आणि डॉ. गणेश कदम यांनी तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. यावेळी फार्म वरील विविध प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली.

     

    डी. वाय. पाटील फार्म भेट दिली. या भेटीवेळी विविध प्रकारच्या भाजीपाला, शोभिवंत झाडांची रोपवाटिका, फळ रोपवाटिका, आधुनिक तंत्रज्ञानाचा जनावरांचा गोठा, गांडूळ खत, अझोला प्रकल्प, दुग्ध प्रक्रिया यूनिट, भाजी व फळे प्रक्रिया यूनिट, आधुनिक हरितगृह, रोपवाटिका, फळ लागवड, नारळ बागेतील केळी व मसाला पिकांची लागवड भाजीपाला लागवड तंत्रज्ञान एकात्मिक कीड व रोग नियंत्रण बद्दल समक्ष प्लॉटवर भेट देऊन माहिती घेतली. यासठी फॉर्म हेड अमोल गाताडे यांचे यावेळी सहकार्य लाभले.

     

    कृषी विज्ञान केंद्राद्वारे मागील तीन वर्षात राबवलेल्या तांत्रिक उपक्रमाचा यावेळी शास्त्रज्ञानी आढावा घेतला. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी मागील तीन वर्षातील तांत्रिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणे, प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिके, शेतावरील चाचणी प्रयोग शेतकरी मेळावे व कृषी विस्तार द्वारे घेतलेल्या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. यावेळी शास्त्रज्ञच्या माध्यमातून ‘एक पेड मां के नाम’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत वृक्षरोपण करण्यात आले.

     

    दुपारच्या सत्रात कृषी विज्ञान केंद्र मार्फत दत्तक घेतलेल्या शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव या गावात शास्त्रज्ञ – शेतकरी चर्चासत्र झाले. यावेळी शेतकऱ्यांनी केव्हीकेमार्फत घेतलेल्या शेतावरील चाचण्या प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिके त्याचबरोबर सर्व शेती उपयुक्त तंत्रज्ञान आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेल्याची माहिती शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांना दिली. या चर्चासत्रासाठी गावातील शंभरहून अधिक शेतकरी उपस्थित होते

     

    यानंतर गावातील पायगोंडा पाटील, विजय पाटील, यांच्या सोयाबीन प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिके प्लॉट, त्याचबरोबर देवगोंडा पाटील, दादासो पाटील, भाऊसो साजने, विनायक चौगुले,विक्रम चौगुले, राजू मोहिते, श्रीकांत पाटील व बजरंग कोगले यांच्या सिताफळ, पेरू, शेवगा, केळी,चिकू, उसातील पाचट व्यवस्थापन प्लॉट्स भेट दिली. सो सुरेखा पाटील यांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, मच्छिंद्र कुंभार, वाठार व सुमित दनाने, किणी यांच्या रोपवाटिका व दुग्ध प्रक्रिया युनिट्स शास्त्रज्ञांनी भेट दिली.

     

    या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र चे शास्त्रज्ञ प्रा सुधीर सूर्यगंध, प्रा दीपक पाटील, प्रा राजवर्धन सावंत भोसले, प्रा. दिपाली मस्के, डॉ. निनाद वाघ, गंगासागर मोरे, प्रकाश पाटील, निलेश पाटील, रोहन साळोखे, बाजीराव पाटील, राजाराम माने यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements