महापालिकेच्या नगरपथविक्रेता समितीची सर्वच उमेदवार निवडून आणणार-गटनेते सदा मलाबादे

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    महापालिकेच्या नगरपथविक्रेता समितीची सर्वच उमेदवार निवडून आणणार-गटनेते सदा मलाबादे

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या नगरपथविक्रेता समितीची निवडणुक एकदिलाने लढवणार असून पाचही उमेदवार निवडून आणणार आहे. असा निर्धार शहर फेरीवाले विकास आघाडीचे गटनेते सदा मलाबादे, अध्यक्ष दिपक पाटील व उपाध्यक्ष बाबासों कोतवाल यांनी बोलून दाखवला. याबाबत आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी निवडणुकीसाठीचे उमेदवार उपस्थित होते.

    Advertisements

     

    यावेळी बोलताना सदा मलाबादे दिपक पाटील व बाबासाहेब कोतवाल म्हणाले महापालिका नगरपथविक्रेता समिती निवडणूक गुरुवार २९ रोजी होत आहे. यासाठी शहर फेरीवाले विकास आघाडीकडून पाच उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून राकेश पुंडलिक माळी, मनिष राजशेखर नायडू सर्वसाधारण महिला प्रवर्गातून लक्ष्मी हणमंत कांबळे, इतर मागास प्रवर्गातून वसिम सलाउद्दीन बागवान, अल्पसंख्यांक प्रवर्गातून समीर दादासाहेब सोलापुरे हे उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीसाठी भाजपा काँग्रेस तसेच माकप पश्नाने एकत्रितपणे उमेदवार उभे केले आहेत. यासाठी संबंधित पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परवानगीही घेतली आहे. शहरातील फेरीवाल्यांच्या उन्नतीसाठी कोणताही पनीय अभिनिवेश न ठेवता सर्वजण एकत्र आलो आहोत विरोधकांना बिनविरोधचा प्रस्ताव दिला होता पण त्याला मान्यता न दिल्याने ही निवडणूक लागली आहे यामध्ये एकूण ८४२ सभासद मतदान करणार असून त्यामध्ये १२९ महिला व ७१३ पुरुष सभासद आहेत. ही निवडणुक जिंकल्यास समितीच्या माध्यमातून शहर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी चौक व मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे, चिकन ६५ व बिर्याणीच्या गाड्यांचे पुनवर्सन, खाद्यपदार्थाचे गाडे लावण्यासाठी नियमावलीची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. शहर फेरीवाले विकास आघाडीच्या माध्यमातून यापुर्वीच वेणुताई पोवार, सुवर्णा कुसळे या दोनही महिला उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तसेच माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अशोकराव जांभळे, काँगसचे शशांक बावचकर, संजय कांबळे यांच्यासह सर्वांनीच आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत निश्चितच विजयी होवू असा विश्वास उपस्थितांनी वर्तवला आहे.विनोद शिंगे कुंभोज

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements