छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न.

     

     

    हेरले /(प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी विकास संस्थेचे वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होत आहे भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक योजना सुरू करणार असून यातून संस्था जिल्हा पातळीवर नाव रुपास येणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले.

    Advertisements

    ते श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेची २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

     

     

    यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक मुंडे होते .मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली.

     

     

    चेअरमन अशोक मुंडे म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ७ कोटी पर्यन्त कर्ज वाटप तर ४ कोटी पर्यंतच्या ठेवी संस्थेकडे असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागिल्या जात आहेत.भविष्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा अन्य सुविधा तसेच अन्न उपक्रम राबविण्यात जाणार आहेत.तसेच संस्थेच्या वतीने लेक लाडकी योजना सुरू करत असून यामध्ये ज्या सभासदाला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने संस्थेच्या वतीने ५००० रुपये अठरा वर्षाकरिता ठेवले जाणार असून ते त्या मुलीच्या १८ व्या वर्षी परत दिले जाणार आहे. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे.

    संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

     

    या प्रसंगी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच नीलोफर खतीब,स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार,राजगोंड पाटील सर, यांनी मनोगते व्यक्त केली.

    या सभेस उद्योगपती सरदार आवळे,राजगोंड पाटील , सरपंच राहुल शेटे,उपसरपंच नीलोफर खतीब,ग्रा. सदस्य हीरालाल कुरणे, शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले व्हा. चेअरमन लक्ष्मण निंबाळकर, व्हा चेअरमन कपिल भोसले, उदय चौगुले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील,मुनीर जमादार,सुकुमार कोळेकर, रावसाहेब चौगुले, पांडू चौगुले, संजय परमाज,आदी मान्यवरांसह सभासद, संस्थेच कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले यांनी मानले.

     

     

     

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements