निलेवाडीच्या बोरगे कुटुंबियांचा आदर्श, वृक्षारोपणातून केले रक्षा विसर्जन

    निलेवाडीच्या बोरगे कुटुंबियांचा आदर्श, वृक्षारोपणातून केले रक्षा विसर्जन

     

     

    नवे पारगाव : निलेवाडी तालुका हातकणंगले येथील कै.काशिनाथ रामचंद्र बोरगे उर्फ स्वानंद स्वामी यांचं नुकतच निधन झालं व त्यांच रक्षा विसर्जन झाल या निमित्ताने त्यांची मुलं प्रा. विलास बोरगे व संजय बोरगे यांनी समाजाला दिशा देणारा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या वडिलांची एक मूठ रक्षा फक्त श्रद्धेसाठी नदीत विसर्जन केली व उर्वरित रक्षा त्यांच्या नावाने दोन झाडे आणून ते झाडे स्मशानाशील परिसरात वृक्षारोपण केले व त्या झाडांना ते रक्षा अर्पण केली.
    मुलांच्या पैकी विलास हे शिक्षक असून त्यांनी हा समाज सुधारक उपक्रम आपल्यापासूनच सुरुवात व्हावा या उद्देशाने पारंपारिक विचारांना फाटा देऊन आपल्या मृत वडिलांची रक्षा विसर्जन न करता वृक्षारोपण करून त्या झाडांना घालून समाजापुढे एक आदर्श शिक्षकाचा नमुना सादर केलेला आहे. निलेवाडी सारख्या लहानशा पण पुरोगामी गावांमध्ये सुरू झालेला हा विचारांचा जागर भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचावा व समाजातील ज्या प्रथा कालबाह्य झालेले आहेत अशा प्रथांना फाटा देऊन आधुनिक विचार लोकांनी करावा व या पद्धतीने भविष्यात बोरगे कुटुंबियांचा आदर्श गावाने व परिसराने घ्यावा अशी अपेक्षा प्रा विलास बोरगे व संजय बोरगे यांनी व्यक्त केली.