मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघ जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला- प्रदेशाध्यक्ष सुमित कदम

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघ जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला- प्रदेशाध्यक्ष सुमित कदम

     

     

    हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील नुतन पदाधिकाऱ्यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते निवड पत्राचे वाटप करण्यात आले.

    Advertisements

    जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत,नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद तसेच शेजारी बसलेल्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी प्रयत्न करावेत असे मत जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी व्यक्त केले.

    लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणत्याही जागांची मागणी केली नव्हती पण विधानसभेला जनसुराज्य पक्षाकडून सन्मानजनक जागांची मागणी केल्याची आठवण करून देत मिरज आणि जत विधानसभा जनसुराज्य शक्ती पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केला. तसेच मिरज आणि जत या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्या अशी मागणी महायुती नेत्यांच्याकडे त्यांनी केली आहे.जनसुराज्य शक्ती जिल्हाप्रमुख पदी आनंदसागर सुभाष पुजारी,जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी डॉ.पंकज महादेव म्हेत्रे,जनसुराज्य युवा शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी अल्ताफ कादर रोहिले,जनसुराज्य शक्ती युवक सांगली जिल्हा अध्यक्ष पदी सुशांत दिनेश काळे,जनसुराज्य शक्ती जिल्हा उपप्रमुख पदी चैतन्य कलकुटगी,जनसुराज्य शक्ती सांगली जिल्हा संघटक पदी सलीम पठाण,जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल डोंगरे,सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी सुमित सुनील भोसले,जनसुराज्य युवाशक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्ष तुषार ब्रम्हदेव भोसले,जनसुराज्य युवाशक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार सुकुमार जाधव.

    जनसुराज्य शक्ती अल्पसंख्यांक सांगली जिल्हा उपाध्यक्ष अलीम पठाण,जनसुराज्य शक्ती मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर,जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्यांक सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी कासम मुल्ला,जनसुराज्य शक्ती पक्ष मिरज तालुकाध्यक्ष सुनिल बंडगर,जनसुराज्य शक्ती महिला मिरज शहर अध्यक्ष डॉ.संगीता प्रदीप सातपुते,जनसुराज्य शक्ती ओबीसी मिरज शहराध्यक्ष विनायक रुईकर,जनसुराज्य युवाशक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल जामदार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची सांगली – मिरज – कुपवाडच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.

    यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांच्या सह नुतन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements