खोतवाडी उपसरपंच निर्मला खोत यांचा आवाडे परिवाराच्या वतीने सत्कार
कुंभोज, प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-खोतवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निर्मला खोत यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे व मोश्मी आवाडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच खोतवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लागेल ते सहकार्य करू अशी आश्वासन आमदार प्रकाश आवडे यांनी दिले,यावेळी वैभव पोवार, करण खोत, अमर खोत, चंद्रकांत खोत, बापू चोपडे, रामचंद्र खोत, सौरभ खोत उपस्थित होते.