शिये हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज शिये मध्ये ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    शिये हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज शिये मध्ये ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

     

     

     

     

    शिये : येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिये संचलित शिये हायस्कूल ज्युनिअर कॉलेज शिये मध्ये भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहण प्रा.कृष्णात बसागरे सर यांचे शुभहस्ते करणेत आले . यावेळी १० वी व१२ वी तसेच NMMS व सारथी शिष्यवृत्ती गुणवंत यशवंत विद्यार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करणेत आला . तसेच ५ वी च्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणेत आले . विविध विषयावर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.तसेच श्री रामकृष्ण विवेकानंद वाचनालय शिये यांचेवतीने घेणेत आलेल्या वकतृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करणेत आले.कला विभाग यांचेवतीने घेणेत आलेल्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गाडवे,जेष्ठ संचालक एम. डी.पाटील, नूतन संचालक उद्योगपती बदाम पाटील , संचालक जीवन पोटे, शिक्षक प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी , तसेच पालक उपस्थित होते.प्रास्ताविक पाडळकर सर यांनी केले.सुत्रसंचालन भोसले एस.एस.यांनी केले तर आभार होलवान सर यांनी मानले.नियोजन पर्यवेक्षक पाथरे सर व सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements