सेवानिवृत्तांना सभासद करण्याचा ठराव कोजिमाशि वार्षिक सभा

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    सेवानिवृत्तांना सभासद करण्याचा ठराव
    कोजिमाशि वार्षिक सभा

     

     

    हेरले / (प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ( कोजिमाशिच्या ) सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अ वर्ग सभासद करण्याचा ठराव ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आला. तसेच सभासद कर्ज मर्यादा ४२ वरून ४७ लाख रुपये व दोन लाख रुपये तातडीच्या कर्जास १० ऐवजी ९ टक्के व्याजदर करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष मदन निकम यांनी केली. महासैनिक दरबार हॉल येथे अडीच तास खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली.
    सभासदांना १९ टक्के लाभांश देणे, स्टाफिंग पॅटर्नला मंजुरी देणे, मुरगुड शाखा इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास मंजुरी आदी सभेपुढील विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
    तज्ञ संचालक दादा लाड म्हणाले, सभासदांचे विश्वासास पात्र राहून संस्थेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे संस्थेने सहाशे कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे.
    संस्थेला चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ८७ लाख रुपये नफा झाला आहे. संस्थेने २२८ कोटी २ लाख रुपये गुंतवणूक केली आहे.अहवाल वाचन मुख्य कार्यकारीअधिकारी जयवंत कुरडे यांनी केले.
    संस्थेने स्वमालकीच्या वास्तुत सर्व शाखा उभ्या कराव्यात अशी मागणी सुहास पाटील यांनी केली. दीपक साठे यांनी संस्थेने ॲप तयार करून सभासदांना घरबसल्या खात्याची माहिती देण्याची मागणी केली.
    विनोद उत्तेकर,शिवाजी नाईक,पवन पाटील ,अशोक मानकर ,अंकुश कांबळे ,अमरसिंह रजपूत आदी सभासदांनी प्रश्न विचारले.
    संचालक उत्तम पाटील, लक्ष्मण डेळेकर ,अनिल चव्हाण , दत्तात्रय घुगरे , राजेंद्र रानमाळे ,प्रकाश कोकाटे ,शरद तावदारे , पांडुरंग हळदकर , दिपक पाटील , श्रीकांत पाटील , सुभाष खामकर , मनोहर पाटील,राजेंद्र पाटील,अविनाश चौगुले,सचिन शिंदे, राजाराम शिंदे , जितेंद्र म्हैशाळ ,ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी आभार मानले.

    Advertisements

    चौकट
    दिवाळीला तेलाबरोबर तूपही

    सभासदांना दीपावली भेट म्हणून यावर्षी तेलाबरोबर तूपही द्यावे अशी मागणी मुख्याध्यापक जी.एस.पाटील यांनी केली. त्यानुसार सभासदांना दहा किलो तेलाबरोबर तूपही देण्याचे यावेळी दादा लाड यांनी जाहीर केले.

    सभासदांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे

    आजच्या सभेत सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सभासदांच्या या सर्व प्रश्नांना तज्ञ संचालक दादा लाड व अध्यक्ष मदन निकम यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सुमारे अडीच तास ही सभा चालली.

    गोड भोजनाचा आस्वाद
    संस्थेने सभास्थळी सभासदांना गोड जिलेबीच्या जेवणाची सोय केली होती.त्याचा आस्वाद सभासदांनी घेतला.यावेळी काही सभासदांनी परिवारासह हजेरी लावली होती.

    स्वप्निल कुसाळेचे अभिनंदन
    नेमबाजीत ऑलम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे याने कास्यपदक मिळविल्याबद्ल त्याच्या अभिनंदनाचा ठराव क्रीडा शिक्षक एस.पी.पाटील यांनी टाळ्यांच्या गजरात मांडण्यात आला.

    फोटो
    कोल्हापूर:कोजिमाशिच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष मदन निकम ,व्यासपिठावर तज्ञ संचालक दादा लाड, श्रीकांत कदम, जयवंत कुरडे, संचालक मंडळ .

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements