बुवाचे वठार सरपंच पदी संगीता शिंदे यांची बिनविरोध निवड

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    बुवाचे वठार सरपंच पदी संगीता शिंदे यांची बिनविरोध निवड

     

    खोची,(भक्ती गायकवाड):-बुवाचे वठार (ता.हातकणंगले) ग्रामपंचायतच्या सरपंच पदी संगीता गुंडाप्पा शिंदे यांची निवड झाली. सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सदर निवड बिनविरोध झाली.सरपंच मंगल परीट यांनी राजीनामा दिल्याने सदर पदे रिक्त झाले होते.सरपंच निवडीसाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मंडल अधिकारी राजश्री पचंडी यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडूक झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांना ग्रामविकास अधिकारी वासंती कुलकर्णी,तलाठी प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले.नूतन सरपंच निवडीनंतर संगीता शिंदे यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.सदर सरपंच निवड बैठकीस मावळत्या सरपंच मंगल परीट, उपसरपंच शंकरराव शिंदे,सदस्य कृष्णात वाठारकर,जावेद पाथरवट, दत्तात्रय पाटील,विजय कागवाडे,शोभा शिंदे,ताई अनुसे,कोमल शिंगे उपस्थित होते.

    Advertisements

    सरपंच संगीता शिंदे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.यावेळी नूतन सरपंच संगिता शिंदे यांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलावर सुतार,मोहन शिंदे,सुनील चौगुले,मदन अनुसे, डॉक्टर विकास बावचे,विलास मगदूम,यशवंत अनुसे,उद्धव चौगुले,निवृत्ती शिंदे,बाजीराव चौगुले,स्वप्निल शिंदे,अनिल सुर्यवंशी,गुंडाप्पा शिंदे,रणजित शिंदे,सपंत चौगुले, महेश शिंदे,अरुण अनुसे,नितिन शिंदे,भगवान शिंगे,स्वप्नील पाटील,योगेश नामदे,डॉ.विश्वजीत चौगुले,नितीन चौगुले आदीसह योगेश कांबळे,सुनिल मगदूम,आक्रम शेख,भागवत कुंभार,कुमार कुंभार मान्यवर,कार्यकर्ते उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements