प्रा.गफूर मकानदार सहाय्यक प्राध्यापक पात्रता सेट परीक्षा उत्तीर्ण

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    प्रा.गफूर मकानदार सहाय्यक प्राध्यापक पात्रता सेट परीक्षा उत्तीर्ण

     

     

    हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ०७ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रतापरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये प्रा. गफूर अश्रफ मकानदार यांनी गणितशास्र या विषयात यश प्राप्त केले आहे. हे संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये गणित या विषयाचे अधिव्याख्याता म्हणून २०१२ पासून कार्यरत आहेत.

    Advertisements

    प्रा. मकानदार यांचा जन्म अत्यंत गरीब परिवारात झाला. त्यांनी खूप शिक्षण घ्यावे असे त्यांच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी शिक्षणाची कास धरून आपले शिक्षण पूर्णकेले. शिक्षण घेत असताना त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्या परिस्थितीचा सामना करत त्यांनी शिवाजी विद्यापीठातून गणितासारख्या अवघडविषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांना विविध महाविद्यालयात गणित विषयाच्या व्याख्य्नासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ऊर्जावर्धित व आपल्या कामावर प्रेम करणारे शिक्षक असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे आणि वागणुकीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. त्यांची बुद्धिमत्ता खूप तल्लख आहे.”रामानुजन परीक्षेमध्ये ते भारतात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत”. ते करीत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक प्रवाहात मानाचं स्थान निर्माण करून देण्याच्या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आलेल्या “फकीर लोकांची सार्वजनिक पिराची मशीद” यासंस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते.

    या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त,विनायक भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements