Home कोल्हापूर जिल्हा पेठ वडगांव परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

पेठ वडगांव परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

पेठ वडगांव परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

 

 

पेठ वडगांव, प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली वाठार तर्फ वडगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रा.पं.सदस्या सौ रेश्मा शिंदे यांच्या हस्ते फोटो पूजन करून नूतन सरपंच सागर कांबळे व उपसरपंच गजेंद्र माळी यांच्या हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Advertisements

यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.डी.शिंदे,ग्रा.पं.सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार,पत्रकार प्रकाश कांबळे, सिटी सर्वे ऑफिसर राहूल पाटील, सुरज नदाफ, सचिन मस्के दिपक कांबळे, कर्मचारी विशाल कांबळे,शिवाजी गायकवाड,महेश कुंभार, सुनील कांबळे, आप्पासो दबडे यांच्या सह अनेक लोक उपस्थित होते.
वाठार येथील आण्णा भाऊ साठे नगर येथे वाटेगाव हुन आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले तसेच जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास नूतन सरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपसरपंच गजेंद्र माळी, ग्रामपंचायत अधिकारी डी डी शिंदे,ग्रा पं सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार, राहुल पोवार,पत्रकार प्रकाश कांबळे,विजय माने,शिवसेना उपतालुका प्रमुख उदयसिंह शिंदे, संदीप दबडे, बी एस पाटील,संदीप पाटील,सुरज नदाफ, सचिन मस्के,सचिन घाटगे,राकेश लोखंडे, राम दबडे, यांच्या सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी दलित महासंघ जिल्हाध्यक्ष बाबासो दबडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार नयन दबडे यांनी मानले.

पेठ वडगांव सिद्धार्थनगर-

येथील समाज मंदिरामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास माजी जि प सदस्य दलितमित्र अशोकराव माने बापू यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की सामान्यांच्या कल्याणासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्य भर कार्य केले आपल्या लेखणीतून लोकांचे प्रश्न आणि व्यथा मांडल्या ते सोडवण्यासाठी संघर्ष हि केला त्यांचे लोककल्याण कारी कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे ते बोलताना म्हणाले यावेळी संजय सूर्यवंशी,अजित ठोमके, सुशांत आवळे, अक्षय कांबळे, धनपाल दबडे यांच्या सह गावातील नागरिक समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होता.

अंबप ग्रामपंचायत कार्यालय-

येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी उपसरपंच माणिक दाभाडे, ग्रा पं सदस्य अविनाश अंबपकर, कृष्णात गायकवाड, आशिफ मुल्ला, सरिता कांबळे,सारिका हिरवे, संगीता जाधव, ज्योती माने,रेखा गायकवाड, भारत पाटील, जलरक्षक संतोष हिरवे आदी उपस्थित होते.

अंबप अण्णा भाऊ साठे चौक-

येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री शिक्षण समुहाचे अध्यक्ष राजेंद्र माने सर,संजय गांधी निराधार योजना सदस्य तानाजी ढाले, आर पी आय हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश अंबपकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष उंडे,भारत पाटील  मान्यवरानी अभिवादन केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements