महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने मंत्रालयात निवेदन
हातकणंगले, प्रतिनिधी(विनोद शिंगे):- महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत संपलेली असून याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण करून त्रिपक्षीय समिती गठीत करावी व पगारवाढीचा निर्णय लवकर होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष आ. भाई जगताप , सल्लागर सुनिल शिंदे ,जनरल सेक्रेटरी राजेंद्र होनमाने , कार्याध्यक्ष श्रीनिवास देशमुख , उपाध्यक्ष अभिमन्यू देशमुख ,खजिनदार उदय भंडारी, विठ्ठल गायकवाड, भारत मासाळ, गफुर दुर्गुडे बाळासाहेब दुग्जे, आधार पाटील, अक्षय गुजरे, ऑफिस सेक्रेटरी अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली लढा चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष माननीय आमदार भाई जगताप साहेब व सल्लागार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त, कामगार मंत्री, सहकार मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव, साखर संघ,पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील साखर कामगारांना पगार वाढ व इतर सोयी सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने हंगाम 2024-25 या गाळप हंगामाच्या अगोदरच आपले हक्क मिळवून घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन प्रयत्न करत असून राज्यातील साखर कामगारांनी सावधान होऊन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्याच पाठीशी खंबीरपने उभे राहावे असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष मा. आमदार भाई जगताप व सुनिल शिंदे यांनी केले आहे.