विद्यार्थ्यांनी देशासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काम करावे: डॉ.संजय डी.पाटील

    विद्यार्थ्यांनी देशासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काम करावे: डॉ.संजय डी.पाटील

    डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे मध्ये गुणगौरव सोहळा संपन्न

     

     

    नवे पारगाव : डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व देश सेवेसाठी करावा, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी केले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत यश मिळविलेल्या महाविद्यालयाच्या 40 विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात डॉ. पाटील बोलत होते.

     

    या परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या पूजा रसाळ हिने राज्यात द्वितीय तर प्रगती तोरस्कर हिने राज्यात चतुर्थ क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे तसेच ईतर विद्यार्थ्यांंना सुद्धा या परीक्षेमध्ये अनुक्रमे 15वा,19 वा, 21 वा, 23 वा, 25 वा, 26 वा, 27 वा, 28 वा, 30वा, 32 वा, 35 वा, 36 वा ,38 वा आणी 40 वा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यानी मिळवलेले हे यश अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यार्थांनी कष्ट केल्यास यश निश्चितच मिळते. कृषी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देण्यची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. येथे मिळवलेले हे ज्ञान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व देशसेवेसाठी वापरावे.

     

    विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाने दिलेल्या सर्व सोयी सुविधा, शिक्षकांनी घेतलेले परिश्रम तसेच सीनियर विद्यार्थ्यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन व आई- वडिलांचा आशिर्वाद या सर्वांना आपल्या यशाचे श्रेय दिले.

    कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने पदवी व पदव्युत्तर परीक्षामध्ये चांगले यश मिळवत असून हे अभिमानास्पद आहे.

    डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी व्यापक संधी उपलब्ध आहे. कृषी संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यानी योगदान द्यावे.

    प्राचार्य डी. एन. शेलार यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालया मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाचे विद्यार्थी कुमारी माधुरी धनगर व धैर्यशील काजळे यांनी केले तसेच प्राध्यापिका डॉ. एम.जी. लगारे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले

    कार्यक्रमास कृषी अभियांत्रिकी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.एस बी पाटील, प्रा. पी. डी. उके, इंजि. ए. बी. गाताडे, प्रा. आर. आर पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते