Home कोल्हापूर जिल्हा हेरले येथे कौतुक विद्यालयाच्या कार्तिक एकादशी निमित्त  दिंडी सोहळा पार पडला

हेरले येथे कौतुक विद्यालयाच्या कार्तिक एकादशी निमित्त  दिंडी सोहळा पार पडला

हेरले येथे कौतुक विद्यालयाच्या कार्तिक एकादशी निमित्त दिंडी सोहळा पार पडला

 

 

 

हेरले ,(प्रतिनिधी) :-हेरले (ता हातकणंगले) येथे कार्तिक एकादशी निमित्त  कौतुक विद्यालय यांच्या वतीने आदर्श नगर माळभाग हेरले , नुतन विठ्ठल मंदीर,गावभाग पर्यत दिंडी सोहळा पार पडला.

याचेच औचित्य साधून येथील कौतुक विद्यालय या शाळेने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते. विठ्ठल, रुक्मिणी, विविध संतांची मांदियाळी, हातात टाळ घेतलेले वारकरी, यांच्या सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.या दिंडीला सामाजिक आशय देत ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडीची जोड देण्यात आली.

टाळांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. गावातील झेंडा चौकात मुलींनी विठ्ठल नामाच्या जयघोषात फुगड्या घालून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.पारंपारिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी

शुभांगी ढवळे, अक्षिता कोळेकर,ज्योती पाटील,करिश्मा खतीब, शीतल कोळी, प्रतिक्षा पाटील,नीता माळी, श्वेता पाटील रुपाली घुघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

फोटो :-हेरले (ता हातकणंगले)येथे कार्तिक एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीतील सहभागी विद्यार्थी .