जिजाऊ बालविकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी मध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    जिजाऊ बालविकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी मध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम

     

     

     

     

     

     

     

     

     

     

    हातकणंगले ,प्रतिनिधी (विनोद शिंगे): आज आषाढी एकादशीचा कार्यक्रम प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विठ्ठल व रखुमाई यांच्या वेशभूषे मध्ये इ.४थी मधील चि. सोहेल नदाफ आणि इ. ३री मधील कु. आरोही वाडकर होते. इ. ४थी मधील चि. श्रीशैल्य जितेंद्र देसाई यांने त्याच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती प्रशालेस भेट दिली.

    Advertisements

     

    कार्यक्रमाचे सुरुवात पालखी पूजनाने करण्यात आली.नंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून गावामधून भव्य दिंडी काढण्यात आली. गावांमधील महिलांनी पालखी पूजन केले. विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाने गावामधील वातावरण हे आनंदी आणि भक्तीमय झाले होते.

     

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग नाईक, शाखा गायकवाड, विनायक जाधव तसेच संस्थेचे संस्थापक  एस .डी.पाटील सर हे उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहा.शिक्षका सौ. अस्मिता पाटील टीचर यांनी केले सौ प्रीती पाटील टीचर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. पद्मश्री पाटील मॅडम यांनी सूत्रबद्ध नियोजन केले आणि सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदाने संपन्न झाला.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements