कुंभोज येथे मोहरम व आषाढी एकादशी सणानिमित्त शांतता बैठक संपन्न
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज (ता. हातकलंगले) येथे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन येणारा मोहरम व आषाढी एकादशी हा सण उत्साहाने व शांततेत संपन्न करावा .यासाठी हातकणंगले पोलीस स्टेशन व कुंभोज ग्रामस्थ यांच्यावतीने कुंभोज येथे हजरत शाहखताल साहेब दर्ग्यामध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायगर होते.
यावेळी कुंभोज येथे मोहरम संण मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिम बांधव साजरा करत असून त्या दिवशी आषाढी एकादशी हा सण ही साजरा केला जातो. दोन्ही सण शांततेने संपन्न करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान यावेळी उपस्थित शासकीय कर्मचारी व ग्राम पंचायत कुंभोज यांनी नागरिकांना केले. यावेळी हिंदू मुस्लिम नागरिकांनी मोहरम व आषाढी एकादशी हा सण मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न केला जाईल अशी आश्वासन हातकणंगले पोलिसांना दिले.
यावेळी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे ग्रामपंचायत सदस्य सदाशिव महापूरे, आप्पासाहेब पाटील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांद मुजावर, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, निवास माने,पत्रकार राजू मुजावर, सुदर्शन चौगुले,इनुस मुजावर, मुनीर सुतार, सुरेश भगत ,कैलास चव्हाण ,हनुमंत मिसाळ ,राजू अल्ल, तसेच गावातील विविध करबल मेलचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.