विजयसिंह माने यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेट व स्वेटर चे वाटप

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    विजयसिंह माने यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेट व स्वेटर चे वाटप

     

    अंबप,(प्रतिनिधी):- बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे Kdcc Bank संचालक विजयसिंह अशोकराव माने यांचा वाढदिवस दिनांक 4 डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

    Advertisements

    वाढदिवसानिमित्त अशोकराव माने पॉलिटेक्निकच्या एनएसएस Polytechnic NSS कमिटी व स्टाफ यांच्यामार्फत अंबप,पाडळी मनपाडळे व भादोले परिसरातील ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेट व त्यांच्या मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.

    अशोकराव माने ग्रुप व अशोकराव माने पॉलिटेक्निक शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कार्यामध्ये सुद्धा नेहमीच अग्रेसर राहिले आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ऊसतोड मजुरांना आज विजयसिंह माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यामधून ब्लॅंकेट व स्वेटर च्या मदतीची ऊब मिळाली, याचा आनंद ऊसतोड मजुरांच्या व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

    या उपक्रमामधून ऊसतोड मजुरांच्या 40 कुटुंबांना ब्लॅंकेटचे व जवळपास 50 मुलांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.

    या उपक्रमासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री वाय आर गुरव, एनएसएस कमिटीचे प्रमुख प्रा.एम.एस.पाटील, आर.बी.मुळीक, प्रा.एन. वाय. पाटील, वीरेंद्र पाटील व अजित पाटील, सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements