डॉ.शंकर अंदानी यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पंढरपूर,(प्रतिनिधी):- ईगल न्यूज नेटवर्कचा Eagle News network पंढरपूर येथे पार पडलेल्या वर्धापनदिनानिमित्त अहमदनगर येथील प्रख्यात समाजसेवक डॉ.शंकर अंदानी Dr.Shankar Adani यांना ईगल न्यूज नेटवर्कचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार Jivan Gaurav Award मा.आम.रामहरी रुपनवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री अंदानी हे शेकडो सामाजिक संस्था व व्यक्तींना सतत मार्गदर्शन करीत असतात. सिंहगड इंन्स्टिटयूट पंढरपूर येथे ईगल न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार.पडला.
यावेळी मा.आ.रामहरी रुपनवर, सुभाष घुले ,उपायुक्त पणन, प्रा.डॉ.कैलास करांडे, कँम्पस डायरेक्ट सिंहगड इन्स्टिट्यूट, किशोरभाई भंडारी, संपादक जाज्वल्य न्यूज, प्रवीण काकडे,प्रा.महादेव तळेकर, लुनेश वीरकर ,संचालक अहिल्याबाई होळकर एज्यु.सोसा.सांगली आदी मान्यवर उपस्थित होते.
सीए (डॉ.) शंकर घनशामदास अंदानी यांचे नुकतेच भारतीय पोस्टाचे 5 रुपयांचे पोस्ट स्टॅम्प प्रसारित झाले आहे., युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने सन्मानित, 81 जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड, 381 आंतरराष्ट्रीय अवॉर्ड सर्टिफिकेटस्, 1380 राष्ट्रीय पुरस्कार,61 मानद डॉक्टरेट, 22 जीवन गौरव पुरस्कार, मागील 15 वर्षापासून श्री साई बाबा संस्थानाचे कर सल्लागार,गेले 17 वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेचे आयकर सल्लागार, 521 सामाजिक संस्था मंदिराचे विना मूल्य आयकर सल्लागार,65 गौशाला चे सल्लागार, 511 किसान उत्पादक कंपनीचे सल्लागार, अंतरराष्ट्रीय संघाचे ते महामंत्री आहेत.
या सोहोळ्याचे प्रास्ताविक स्वागत विलासराव कोळेकर यांनी केले.मा.आ.रामहरी रुपनवर , प्रा.तळेकर, श्री घुले साहेब, प्रा.डॉ.महेश मोटे यांनी प्रभावी विचार व्यक्त केले. यावेळी पत्रकार अमृत यादव,श्री संजय थोरात, हारुण मगदूम, संतोष चव्हाण, आदी पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दिपक पोतदार, अशोक शिंदे,दिनेश कांबळे,संजय गायकवाड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
आभार बाबासाहेब राशिनकर यांनी मानले.तसेच उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रा.कांबळे यांनी केले.