प्रताप पाटील यांना भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
चिकुर्डे,(प्रतिनिधी):-चिकुर्डे Chikurde (ता.वाळवा) येथील सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात भाग भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील Pratap Patil (तात्या) पत्रकार अध्यक्ष वाळवा तालुका वारकरी संघटना यांना भास्कर भूषण स्टार आयकॉन हा पुरस्कार Bhaskar Bhushan star Icon Award मिळाल्याबद्दल चिकुर्डे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व सांगली जिल्हा राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष जम्मू पांढरबळे यांनी प्रताप पाटील यांचा शाल श्रीफळ व हार देऊन सत्कार केला स्वागत करताना जंबू पांढरबळे म्हणाले प्रताप पाटील तात्या यांनी सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना स्टार आयकॉन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केला यावेळी सत्कार ला उत्तर देताना प्रताप पाटील म्हणाले की जम्मू पांढरबळे यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबीयांचे आभारी आहे मला मिळालेला पुरस्कार मी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच तमाम महाराष्ट्रातील संतांचे चरणी हा पुरस्कार अर्पण करतो व माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबीयांचा मनापासून आभारी असून असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी त्या कुटुंबाचा राहावा असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी अण्णाभाऊ साठे मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास पांढरबळे आप्पा,प्रा.अतुल पांढरपळे, काशिनाथ पांढरबळे, दीपक पांढरबळे,मोहन पांढरबळे, अविनाश पांढरबळे, अमोल पांढरबळे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जम्मू-पंढरबळे यांनी केले तर आभार विलास पांढरे यांनी मानले.