Home शैक्षणिक आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत डी.वाय.पाटील कृषी संकुल मुलींचा संघ तृतीय

आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत डी.वाय.पाटील कृषी संकुल मुलींचा संघ तृतीय

आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत डी.वाय.पाटील कृषी संकुल मुलींचा संघ तृतीय

 

 

 

तळसंदे, (वार्ताहर):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुरु असलेल्य अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी संकुल तळसंदेच्या मुलींच्या संघाने तृतीय तर मुलांच्या संघाने चौथे स्थान मिळविले. कृषी महाविद्यालयाच्या दर्शन करडे पाटील याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करता विद्यापीठ संघात स्थान मिळवले आहे.

 

वृंदावन कृषी महाविद्यालय गुंजाळवाडी येथे दिनांक 10 व 11 जुलै 2024 रोजी अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या 10 जिल्ह्यांमधील 23 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतलेला होता. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या दर्शन करडे पाटील याने स्पर्धेमध्ये सहा गुण मिळवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघामध्ये आपले स्थान निश्चित केले.

 

या स्पर्धेत श्रेया पाटील, चेतना कित्तूर, श्वेता पोवार, श्रद्धा पाटील व सिद्धी कुंभार, दर्शन करडे-पाटील, अरविंद मुथूराज, चैतन्य घुमरे, प्रतीक खळदकर, राजेश्वर जाधव यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज प्रा. पी. डी. उके व प्रा. आर. आर. पाटील तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी संघाचे, खेळाडूंचे व प्रशिक्षक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे अभिनंदन केले आहे.