शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
पेठ वडगाव,(प्रतिनिधी) :- प्राथमिक विद्यामंदिर पेठ वडगाव या शाळेच्या वतीने शाळेतील पहिले पाऊल वृक्षलावून हा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशीच वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात शिक्षकांनी या मुलांचे औक्षण करत गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत केले. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या नावे शाळा परिसरात एक झाड लावण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला या झाडाचाही वाढदिवस साजरा व्हावा असे आवाहन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती महीराज जमादार यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांचे मार्गदर्शन व कार्याध्यक्ष विकासराव माने यांचे प्रोत्साहन मिळाले.
यावेळी प्रफुल्ल बच्चेसर सौ.माधवी सनदी तसेच व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.