Home अपघात अंबपवाडी रस्त्यावर स्कूल बस घसरली; सुदैवाने दुर्घटना टळली

अंबपवाडी रस्त्यावर स्कूल बस घसरली; सुदैवाने दुर्घटना टळली

अंबपवाडी रस्त्यावर स्कूल बस घसरली ; सुदैवाने दुर्घटना टळली

 

अंबप,प्रतिनिधी (किशोर जासूद):- हातकणंगले तालुक्यातील अंबप-अंबपवाडी रस्त्याला पेठ वडगांव येथील जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूलची बस घसरली. सुदैवाने शाळेचे विद्यार्थी सोडून परताना ही घटना घडल्याने यात विद्यार्थी नव्हते. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

शुक्रवारी दिवसभर पावसाची संतधार सुरूच आहे. सायंकाळी जिनिअस इंग्लिश मीडियम, पेठवडगाव येथील स्कूलबस लहान मुलांना शाळेतून घेऊन घरी सोडून परतताना अंबपवाडी रस्त्याला डोंगरे वस्तीजवळ स्कूल बस समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना बाजूला घेतल्यानंतर नाल्यात घसरली. सुदैवाने यात मुले नव्हती. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

या रस्त्याला मागील काही दिवसापासून अनेक वेळा नाल्यात वाहने घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शाळेची मुले घेऊन जाणारी मारुती व्हॅन, कोळशाचा ट्रक, दोन दिवसापूर्वी वाळूचा डंपर, अशी वाहने घसरली आहेत. पावसामुळे रस्त्याच्या बाजू पट्ट्या कमजोर झाल्या आहेत. येथून अवजड वाहनांची वाहतूक सतत होत असते .