महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी सुनील घोरपडे तर सचिवपदी संजीव चिकुर्डेकर
कोल्हापूर,(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस Congress संघटनेची वार्षिक सर्वसाधरण सभा राजेंद्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे उत्साहात पार पडली.
सभेमधे सर्वानुमते सन 2024 सालासाठी विभागीय अध्यक्षपदी सुनील घोरपडे तर विभागीय सचिवपदी संजीव चिकुर्डेकर यांची निवड करण्यात आली.
सभेमध सचिव चिकुर्डेकर यांनी गतवर्षीच्या कमकाजाचा आढावा घेऊन संघटनेच्या पुढील धोरणाबाबतची कार्यपद्धती विषद केली. यावेळी संघटनेच्या मागील वर्षीच्या जमा खर्चास सभेने मंजूरी दिली.
सभेमधे अन्यनिवड़ीमधे विभागीय कार्याध्यक्षपदी राजेंद्र आर पाटील, संघटकपदी अरविंद पाटील,खजिनदारपदी बाळकृष्ण डी.शिंदे तसेच कोल्हापूर आगार अध्यक्षपदी तनवीर मुजावर, आगार सचिवपदी अनिता पाटील व विभागीय कार्यालय यूनिट अध्यक्षपदी दीपाली येलबेली,यूनिट सचिवपदी रविराज नलवडे यांच्या निवडी झाल्या.
सभेमधे सेवानिवृत कार्यकर्ते एस.ए.कोळी यांचा सत्कार झाला असून यावेळी इतर संघटनेतून या संघटनेत प्रवेश केलेले कोल्हापूर आगार मधील कर्मचारी मनीषा ताम्बे, नीता मोरे, वैशाली पिंगळे, योगिराज शेळके, गणेश गुरव तसेच गडहिंग्लज आगार मधील एस.एन.ताम्बड़े, व्ही.जी.माळी, के.के.भोई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बी.आर.साळोखे, राजेंद्र भोसले, सुनील घोरपडे,अनिता पाटील,अरविंद पाटील, मारुती पुजारी, दीपाली येलबेली, हबीब चाउस यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेसाठी बी डी शिंदे,उत्तम पाटील, अय्याज चौगुले, रणजित काटकर, तनवीर मुजावर, भगवान जाधव, दीपक सनगरे, सुहास घोरपडे, संदीप पाटील, वसंत पाटील, दिलशान बागवान,दीपाली येलबेली,वैशाली पाटील, वैशाली रेन्दाळे, नीता मोरे,मनीषा ताम्बे, रविराज नलवडे, प्रसाद शिंदे, हिन्दुराव पाटील, सूरज तमायचे, सचिन मुंडाळे, किशोर कावळे यांच्यासह विभागातून बहुसंख़्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष वगरे यांनी केले तर आभार वैशाली पाटील यांनी मानले