डॉ.दीपक शेटे यांना सावित्रीबाई फुले राज्य गौरव पुरस्कार जाहीर 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    डॉ.दीपक शेटे यांना सावित्रीबाई फुले राज्य गौरव पुरस्कार जाहीर

    हेरले,(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सन -२०२१/२२ चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गौरव शिक्षक पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन मिणचेचे शिक्षक डॉ.दिपक शेटे (सर) यांना जाहीर झाला .

    Advertisements

    डॉ . दीपक शेटे हे नागाव तालुका हातकणंगले या गावचे रहिवाशी असून गेली बावीस वर्षे गणित विषयाचे अध्यापन करत आहेत .मुलांना गणित सोपं जावं यासाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम शालेय स्तरावर राबवत असतात .यासाठी त्यांनी त्यांच्या घरी 35 लाख रुपयाची महाराष्ट्रातील अनोखी गणित मोजमापनाची लॅब तयार केले आहे .ती पाहण्यासाठी गणित अभ्यासक, गणितज्ञ, शिक्षक, पालक व विद्यार्थी सातत्याने येत असतात . विद्यार्थ्यांना गोडी लागावी व गणिताचा प्रचार व्हावा यासाठी ते विनामूल्य शाळेच्या कामकाजा व्यतिरिक्त माहिती सांगत असतात .त्यांनी आतापर्यंत सात पुस्तकांचे लेखन केले असून तंत्रज्ञानाचा वापर करून दहावीचे पुस्तक एका पानात बनवण्याची किमया केली आहे .स्टार अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही त्यांच्या संस्थेमार्फत सातत्याने केला जातो .सत्य पूर्ण दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांनी आज अखेर राखली आहे .त्यांचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत .त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये तज्ञ मार्गदर्शक ,गणित व्याख्याते ,सहशालेय उपक्रमात सक्रिय सहभाग ,विज्ञान प्रदर्शन परीक्षक इ.भूमिका पार पडले आहेत .त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डिंग घेतली आहे .
    महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक गौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements