समाजातील सर्व वंचित घटकांसाठी काम करणार – इंद्रजित पाटील
योध्दा फाउंडेशनचा विस्तार.
कोल्हापूर,(अवि शेलार यांजकडून /अनिल सुतार यांजकडून) :- ज्यांच्यासाठी कोणी नाही त्यांच्यासाठी योध्दा फाउंडेशन असणार आहे.या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी काम करणार असल्याचे इंद्रजित उर्फ दादासाहेब पाटील यांनी सांगितले ते पन्हाळा तालुक्यातील कळे येथील योद्धा फाउंडेशनचा कोल्हापूर,सांगली क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या पद नियुक्ती च्या कार्यक्रमात बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी योध्दा फाउंडेशन हे कोल्हापूर सांगली बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवायचे आहे. या फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष कोण हे महत्त्वाचे नाही तर फक्त योध्दा फाउंडेशनच्या नावानेच आपण समाजासाठी कार्य करायचे आहे.त्यामुळे भविष्यात योध्दा फाउंडेशनचा वटवृक्ष होणार असल्याने अशाच पध्दतीने सर्वांना एकत्र करुन फाउंडेशनची ध्येय धोरणे यशस्वी करुया असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आवाहन केले.
योद्धा फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली.यावेळी कळे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन पद नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा चिंचवडे पेट्रोल पंप ते योद्धा फाउंडेशन ऑफिस पर्यंत भव्य रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच योध्दा फाउंडेशनच्या मुख्य ऑफिसमध्ये पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष इंद्रजित पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आलीत.यावेळी सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली.सुरज कुंभोजे यांनी भविष्यात योध्दा फाउंडेशनच्या व टायगर ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाज कार्य करायचे आहे.जेणेकरुन योध्दा फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपाला येईल असे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष ऋषी उपाध्ये, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व टायगर ग्रुपचे सुरज कुंभोजे सरकार, पश्चिम पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष धैर्यशील बेलेकर, कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बालाजी कदम यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी योध्दा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष इंद्रजित पाटील,टायगर ग्रुपचे सुरज कुंभोजे, ऋषी उपाध्ये यासह योध्दा फाउंडेशनचे परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.