हेरलेतील राष्ट्रीय कब्बड्डी खेळाडू
कु.समर्थ ठोंबरे वर अन्याय
हेरले /( प्रतिनिधी) :- हेरले (ता.हातकणंगले) येथील कु. समर्थ कुमार ठोंबरे ( वय १६ )याची मार्चमध्ये संपन्न झालेल्या १६ वर्षाखालील बिहार येथील ३४ वी राष्ट्रीय किशोर गट अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेत निवड होऊन उत्कृष्ट कामगिरी करीत राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला मात्र त्याची १८ वर्षाखालील होणाऱ्या कब्बड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनने निवड केली नाही. १६ वर्षाखाली एका राष्ट्रीय खेळाडूची जिल्हा संघात निवड केली जात नाही. हा अन्याय या खेळाडूवर झाला आहे. असा अन्याय पुन्हा कोणा कब्बड्डी खेळाडूवर होऊ नये म्हणून १६ वर्षाखालील कु. समर्थ ठोंबरे याची राष्ट्रीय खेळाडू म्हणून कशी निवड झाली याची सविस्तर माहिती जय शिवराय कब्बड्डी क्रीडा संघ हेरलेचे प्रशिक्षक शिवराज निंबाळकर, राहूल कराळे, सुशांत ढेरे, विपुल गवळी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे देत आहोत.
समर्थ हा इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असले पासून वयाच्या दहाव्या वर्षापासून जयशिवराय कब्बडी संघात खेळतो आहे. गेली पाच वर्षे तो खुपच चांगला सराव करीत असल्याने त्याचा खेळ खुपच उत्कृष्ट झाला. या त्याच्या उत्कृष्ट खेळाचे यश म्हणजे १५ ते १६ फेब्रुवारी २०२५ मध्ये इचलकरंजी येथे बालभारत मंडळाने किशोर गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत त्याने खेळ उत्कृष्ट केल्याने त्याची जिल्हा संघात निवड झाली. त्याच्या या यशामुळे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक येथे किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत खेळण्याची संधी मिळून राज्य खेळाडू म्हणून उदयास आला. या स्पर्धेत ही उत्कृष्ट खेळ केल्याने त्याची
कोल्हापूर जिल्हयातून एकमेव निवड राष्ट्रीय खेळाडू म्हणून बिहार येथील २७ ते ३० मार्च २०२५ मधील ३४ राष्ट्रीय किशोर गट अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान आपल्या कब्बड्डी खेळाच्या जोरावर मिळविला.
कु. समर्थ हा १६ वर्षाखालील वयोगटात राष्ट्रीय खेळाडू होत असतांना त्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत शिखर गाठले असता त्याची कोल्हापूर जिल्हा कब्बड्डी असोसिएशनने १८ वर्षाखाली जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड का केली नाही, हा प्रकार काय? याचा सर्वांना प्रश्न पडला आहे.
मुले कब्बड्डी खेळाचा सराव करीत असतांना खुप कष्ट घेतात त्यांची स्वप्ने जिल्हा खेळाडू, राज्य खेळाडू ,राष्ट्रीय खेळाडू होण्याची असतात. त्यांना या यशामुळे शासकिय किंवा खाजगी नोकरीत संधी मिळू शकते. त्यांना या खेळाच्या यशातून जिवनात नोकरीच्या माध्यमातून आर्थिक स्थर्ये प्राप्त होऊ शकते. मात्र उत्कृष्ट खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करूनही त्यांची जिल्हा संघातच निवड होऊ शकत नसेल तर त्यांची स्वप्ने अधुरीच राहणार.
१६ वर्षाखालील राष्ट्रीय खेळाडू कु. समर्थ कुमार ठोंबरेची १८ वर्षाखालील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड न करता त्याच्यावर झालेला जो अन्याय आहे. तो अक्षम्य आहे. अशा प्रकारे कोणत्याही कब्बड्डी खेळाडूवर असा अन्याय होऊ नये यासाठी ही माहिती
जय शिवराय कब्बड्डी क्रीडा संघ हेरलेचे प्रशिक्षक शिवराज निंबाळकर, राहूल कराळे, सुशांत ढेरे, विपुल गवळी आदी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे देत आहोत.